पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने बेगम परवीन सुलताना यांचा सन्मान

0

जळगाव | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१६ ने बेगम परवीन सुलताना यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक समन्वयक संजय पाटील, पुरस्कार निवड समितीचे पंडीतनाथ निरळकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे दिपक चांदोरकर उपस्थित होते. ५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

DSC_5639

 

पुरस्कार वितरण सोहळयाच्या अगोदर बेगम परवीन सुलताना यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या पुरस्कार वितरण सोहळयाला व शास्त्रीय संगीत महोत्सवाला सांस्कृतिक मंत्री ना. तावडे अनुपस्थित असल्याने त्यांनी ध्वनिचित्रफितद्वारे मनोगत व्यक्त करून सत्कारार्थी बेगम परवीना सुलताना व शास्त्रीय संगीत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सलग तीन दिवस चालणार्‍या या संगीत महोत्सवाचे पाहिले पुष्प प्रिती पंढरपुरकर यांनी गुंफले.

नवोदितांना प्रोत्साहीत करा- बेगम परवीन सुलताना

पुरस्काराला उत्तर देतांना बेगम परवीन सुलताना म्हणाला की, महाराष्ट्रातील रसिक सर्वाधिक लोकसंगिताला पसंती देतात. शास्त्रीय संगीतच आपली खरी ओळख असून शास्त्रीय संगीत जिवंत ठेवण्यासाठी रसिकांनी नवोदित कलाकारांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. नवोदित कलाकारच संगीताची परंपरा पुढे नेणार आहे. त्यांना ऐकण्याची आपण सवय केली पाहिजे.

भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सांस्कृतिक कार्य संचालनालय व ना.विनोद तावडे व महाराष्ट्रातील रसिकांचे मनस्वी आभार मानले. ज्यांनी शक्ती व आवाज दिला ते माझे वडील, गुरु पंडीत चिन्मय लहेरी, पती उस्ताद दिलशाद खान यांना समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

गायनात वेदना विसरण्याचे सामर्थ्य- कुलगुरु पाटील

जीवन उणे संगीताची बेरीज केल्यास आयुष्य शुन्य आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत संगीत माणसाच्या सोबत आहे.शास्त्रीय संगीतच पाया असून संगीतामुळे माणुस संवेदनशील व सशक्त होत आहे. ताणतणावात विसरण्यासाठी संगीत महत्वाचे असून ती माणसाला मिळालेली अद्रभुतपूर्ण देणगी आहे. गायनात वेदना विसरण्याचे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी केले.

शास्त्रीय संगीताचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार

लोककला व शास्त्रीय संगीताचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ना. विनोद तावडे यांनी घेतला असल्याची माहिती संचालक संजय पाटील यांनी कार्यक्रमावेळी दिली.

LEAVE A REPLY

*