पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या कार्यातून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य सर्व सामान्यांना प्रेरणादायी असून अंत्योदयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचे कल्याण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंडितजींनी देशाला स्वतःला समर्पित केले.
तो आदर्श समोर ठेवून आपण प्रत्येकाने कृतीशिल व्हावे, असे विचार भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी साक्री तालुक्यातील जामदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेंतर्गत आयोजित कार्यक्रमात मांडले.
याप्रसंगी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. पंडितली अत्यंत कुशाग्रबुद्धीचे होते.
लहानपणापासून ते लोककल्याणाचा विचार करणारे होते. आयुष्यभर त्यांनी अविवाहित राहून लोककार्यास वाहून घेतले होते.

जनसंघाच्या उभारणीसाठी पंडितजींचा प्रेरणादायी सहभाग लक्षात घेता आज त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच भारतीय जनता पार्टी चालत आहे.

देशातील वैभवशाली परंपरेला, संस्कृतीला पुढे नेण्यासाठी आयुष्य खर्चणारे थोर विचारवंत, प्रतिभाशाली अर्थशास्त्री होते, असे सांगून विजय चौधरी यांनी केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी लागू केलेल्या योजनांची माहिती दिली.

ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव प्रकाश माळी, खुशाल चौधरी, सरपंच सुमित्रा चव्हाण, शनैश्वर चव्हाण, आप्पा चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*