पंजाबमध्ये महामार्गावर 500 मीटर अंतराच्या आत दारुविक्री करण्यास परवानगी

0

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावर 500 मीटरच्या आत असणारे परमीट रुम, वाईन शॉप, बीयरशॉपी, देशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश दिले होते.

पण आता हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब मालकांना पंजाब सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. पंजाबमध्ये महामार्गावर 500 मीटर अंतराच्या आत दारुविक्री करण्यास परवानगी मिळाली आहे.

विधानसभेत शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मान्यता देत पंजाब अबकारी कर अधिनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

देशभरातील महामार्गांवर पाचशे मीटरच्या परिसरातील दारूची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली. पण राज्य सरकारने पंजाबमध्ये महामार्ग आणि आसपासचे हॉटेल, बार लवकरच पुन्हा दारू विक्री करू शकतील यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या दारूविक्री बंदीतून बाहेर काढण्याचा मार्ग राज्य सरकारने तयार केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाब उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम 26 अ मध्ये सुधारणा करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला.

LEAVE A REPLY

*