न्यू आर्टसच्या ‘माईक’चा पुण्यातही आवाज

0

शाहू मोडक, पुरूषोत्तम करंडकावर कोरले नाव

अहमदनगर(प्रतिनिधी) – न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्सच्या माईक या एकांकिकेने सातवा नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक पटकावला आहे. पुरूषोत्तम करंडकावरही या एकांकिकेने नाव कोरले. संगमनेर महाविद्यालयातील अतिक्रमण डील व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ट्रॅफिक या एकांकिकेने अनुकमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेवर न्यू आर्टस कॉलेजने निविर्र्वाद वर्चस्व निर्माण केले.
माऊली सभागृह येथे कलायात्रिक व नाट्यजल्लोष यांच्या वतीने दरवर्षी आंतर महाविद्यलयीन एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघांना ज्येष्ठी अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते करंडक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव पद्माकर केस्तीकर, सुलभा मोडक, कल्पतरू ग्रुपचे फिरोदिया एन्टरप्रायजेसचे संचालक गौरव फिरोदिया, प्रतिभा मोडक, परीक्षक संकेत पावसे व राहुल बेलापूरकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धामध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या तब्बल 15 संघांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. दिग्दर्शनामध्ये संगमनेर महाविद्यालयांच्या प्रशांत त्रिभुवन यास प्रथम , पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मोनिका बनकरने द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट स्त्री अभिनयामध्ये अहमदनगर महाविद्यालयाच्या स्नेहा पटेलने तर पुरूष अभिनयात अतिक्रमण डीलमधील तुषार गायकवाड यांने प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धाचे निकाल – सांघिक विजेते – प्रथम – माईक (न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज), व्दितीय – अतिक्रमण डील (संगमनेर महाविद्यालय), तृतीय – ट्रॅफीक (पेमराज सारडा महाविद्यालय). दिग्दर्शन प्रथम – प्रशांत त्रिभुवन (अतिक्रमण), व्दितीय – मोनिका बनकर (ट्रॅफीक). उत्कृष्ट पुरुष अभिनेता प्रथम – तुषार गायकवाड (अतिक्रमण), व्दितीय – संकेत जगदाळे (माईक), उत्तेजनार्थ प्रतीक तांबे (मजहबी), विशाल साठे (ट्रॅफीक), शुभम गाडे (दिमडी), स्त्री अभिनय प्रथम – स्नेहा पटेल (अहमदनगर महाविद्यालय), व्दितीय – प्रियांका काळापहाड (ट्रॅफीक), उत्तेजनार्थ – शर्वरी अवचट (शब्द-निशब्द), दीपाली येणारे (स्मशानाचं उदघाटन), श्वेता पारखी (दिमडी), रंगभूषा – वेशभूषा – सोनल उदावंत ,अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर, संगीत – सिध्दार्थ खंडागळे, दिमडी
प्रकाशयोजना – गणेश ससाणे, अल्पविराम (श्रीरामपूर), नेपथ्य – हरिष भोसले, दिमडी, लेखन – तुषार गायकवाड, अतिक्रमण डिल, लक्षवेधी अभिनय – विराज अवचिते (माईक), वाचिक अभिनय – शमा देशपांडे गण)

नगरची छाप पुणे येथील भरत नाट्य मंदिरातही नगरी माईकचा आवाज घुमला. कलोपासक पुणे आयोजित पुरूषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.या स्पर्धाची भरत नाट्य मंदिर येथे काल अंतिम फेरी संपन्न झाली. 51 महाविद्यालयांच्या संघांना या स्पर्धत भाग घेतला होता. या सर्वांत नगरच्या माईकचा अभिनयाचा आवाज मोठा ठरला. माईकच्या दिग्दर्शन आणि अभिनयात कृष्णा वाळकेने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – विराज अवचित्ते (भूमिका भय्या), पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या एकांकिकेतील हरीश बारस्कर याला यशवंतच्या भूमिकेला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

*