न्यूयॉर्कमध्ये ड्रग्जच्या नशेत 23 जणांना चिरडले

0

न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर एका कारने अनेक लोकांना चिरडले.

टाइम्स स्क्वेअरवर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात एलिसा एल्समन नावाच्या 18 वर्षीच मुलीचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत.

26 वर्षीय बडतर्फ लष्करी जवान रिचर्ड रोजासने नशेच्या अंमलात भरधाव कार पादचाऱ्यांच्या अंगावर चढवली. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी रिचर्ड रोजास हा ब्रॉन्क्सचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिचर्डने ड्रग्जच्या नशेत आपली कार फूटपाथवर चढवली आणि त्यानंतर कार पोलला जाऊन धडकली.

 

LEAVE A REPLY

*