नेवासा नगरपंचायत निवडणूक : छाणणीत 39 अर्ज बाद

0

 अर्ज माघारीकडे लक्ष

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 136 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दाखल अर्जांची आज छाणणी झाली. यामध्ये एकूण 39 अर्ज बाद झाले असून आता 17 जागांसाठी 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिलेले आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु ही निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्ष, भाजपा यांच्यात चुरशीची होणार आहे.
नेवासा नगर पंचायतीची प्रथम निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्यांदा नगरसेवकाचा मान आपल्याला मिळावा, यासाठी अनेकजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 136 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यात 39 जणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात एकूण 97 जण राहिलेले आहेत. या निवडणुकीत अपक्षांबरोबरच काही प्रभागात राष्ट्रवादीने आपले उमेदवार उभे केल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्ष व भाजपाची डोकेदुखी वाढलेली आहे. या दोन्ही पक्षांकडून अपक्षांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. नेवासा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम व सहायक निवडणूक अधिकारी अविनाश गांगार्डे व नगर पंचायतचे कार्यकारी अधिकारी संदीप भोळे यांच्या उपस्थितीत छाणणीची प्रक्रिया पार पडली.
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र. 1 – देशपांडे शरदिनी मधुकर (भाजप), पिंपळे योगिता सतीश (क्रांतिकारी), कराळे कमल मुरलीधर (क्रांतिकारी), आहेर राजश्री प्रभाकर (क्रांतिकारी), गव्हाणे अर्चना संतोष (मनसे), उपाध्ये मीरा श्रीकिसन (अपक्ष).
प्रभाग क्र. 2 – सुखधान शालिनी संजय (काँग्रेस), चक्रनारायण ललिता बहिरू (क्रांतिकारी), धायजे छाया दिगंबर (क्रांतिकारी), चक्रनारायण अनिता प्रल्हाद (क्रांतिकारी).
प्रभाग क्र. 3 – जगताप लक्ष्मण गणपत (क्रांतिकारी), कोरेकर गणेश नारायण (क्रांतिकारी), दिनकर नितीन सुरेश (भाजपा), शिंदे रमेश आसाराम (क्रांतिकारी), कडू विलास दत्तात्रय (राष्ट्रवादी), जगताप निलेश लक्ष्मण (क्रांतिकारी), डौले जानकीराम घनशाम (अपक्ष), जिरे कैलास पोपट (शिवसेना), शिंगवी निखिल सुनील (अपक्ष), सावंत बाळासाहेब विठ्ठल (अपक्ष).
प्रभाग क्र 4 – धोंगडे पूनम संदीप (क्रांतिकारी), मुळे कविता ज्ञानेश्वर (क्रांतिकारी), बोरुडे नम्रता विलास (भाजप), डोकडे अनिता भारत (शिवसेना), नवसे निर्मला विष्णू (अपक्ष).
प्रभाग क्र 5 – हापसे चित्तरंजन रावसाहेब (क्रांतिकारी), बडाख प्रशांत नारायण (क्रांतिकारी), वाघचौरे वैभव गणपत (क्रांतिकारी), नागपुरे सचिन जगदीश (भाजप), ठुबे चंद्रशेखर अनिल (क्रांतिकारी), मते कुणाल काकासाहेब (क्रांतिकारी), शिंदे सुनील जगन्नाथ (क्रांतिकारी), शेख मुजफ्फर राजू (अपक्ष), नागपुरे नितीन जगन्नाथ (अपक्ष).
प्रभाग क्र 6 – कुर्‍हे अर्चना जितेंद्र (क्रांतिकारी), सुरेखा राधा शंतनू (भाजप), ताठे अनिता विनायक (राष्ट्रवादी), जगताप सुरेखा नितीन (शिवसेना).
प्रभाग क्र 7 – वाखुरे आशा कारभारी (क्रांतिकारी), लष्करे जनाबाई सूर्यभान (शिवसेना), सांगळे निर्मला सचिन (भाजप), कडू उज्वला संपत (क्रांतिकारी), शेजूळ रुपाली महेश (राष्ट्रवादी), नहार अमिता विजय (मनसे ), हारदे ज्योती मनोज (क्रांतिकारी), फटांगरे सरस्वती दिलीप (क्रांतिकारी), शेख फरहाना राजू (अपक्ष).
प्रभाग क्र 8 – वडागळे सचिन फिलीप (क्रांतिकारी), सरोदे प्रवीण शामराव (क्रांतिकारी), शेंडे नानासाहेब छबुराव (भाजप).
प्रभाग क्र 9 – घोलप राम रेणुकादास (क्रांतिकारी), रासने योगेश सूर्यकांत (राष्ट्रवादी), गायके बापूसाहेब परशुराम (क्रांतिकारी), सोनवणे रणजित दत्तात्रय (भाजप), मोरे बाबासाहेब गणपत (क्रांतिकारी), नांगरे नीरज विलास (शिवसेना), बेहळे संदीप अण्णासाहेब (क्रांतिकारी).
प्रभाग नं 10 – कनगरे भामाबाई भास्कर (भाजप), इरले अंबिका अंबादास (क्रांतिकारी), मीरपगार पुष्पा नितीन (क्रांतिकारी), गायके मुक्ताबाई शांताराम (अपक्ष).
प्रभाग क्र 11 – लष्करे नरसू शेटीबा (क्रांतिकारी), सुरडे विशाल एकनाथ (क्रांतिकारी), कुंभकर्ण कैलास जगन्नाथ (क्रांतिकारी), डहाळे निरंजन कृष्णा (भाजप), बेहळे संदीप अण्णासाहेब (क्रांतिकारी), इरले दीपक शंकर (शिवसेना), इनामदार अनीस शफी (अपक्ष), रासने योगेश सूर्यकांत (राष्ट्रवादी), पंडूरे रमेश चंद्रकांत (क्रांतिकारी).
प्रभाग क्र 12 – पाटील नंदकुमार लक्ष्मणराव (क्रांतिकारी), वाघ सुनील पंडितराव (भाजप), गायके सतीश देवराव (अपक्ष), पारखे मनोज अंबादास (अपक्ष).
प्रभाग क्र 13 – पठाण फिरोजबी इमामाखान (क्रांतिकारी), पोतदार हर्षा राजेंद्र (अपक्ष), पठाण शाहबुद्धीन इलायतखान (क्रांतिकारी), शेख नसीर मुक्तार (भाजप), डहाळे कमल ज्ञानदेव (अपक्ष), शेख जैनापबी रशीद (अपक्ष), काळे ज्योती ज्ञानेश्वर (शिवसेना).
प्रभाग क्र 14 – मापारी मनीषा अमित (क्रांतिकारी), मापारी सीमा राजेंद्र (भाजप), नागे सविता दत्तात्रय (अपक्ष), शेख खुर्शीद इसाक मणियार (अपक्ष), पाटील अनिता निलेश (क्रांतिकारी).
प्रभाग क्र 15 – व्यवहारे गोरक्षनाथ नामदेव (क्रांतिकारी), व्यवहारे दिनेश प्रताप (भाजप). प्रभाग क्र 16 – आतार फारूक हाजीकासाम (क्रांतिकारी), घुले गोरख लहानू (शिवसेना), चौधरी वसिम गणी (भाजप). प्रभाग क्र 17 – बर्डे राणी किशोर (क्रांतिकारी), बर्डे संगीता दत्तात्रय (भाजप), पवार गयाबाई प्रकाश (क्रांतिकारी), पवार आशा भाऊसाहेब (मनसे), पवार वर्षा मारुती (शिवसेना) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केवळ एकच एबी फॉर्म गृहीत धरल्याने बाकीचे सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे प्रत्येक प्रभागात भाजपचा एकच उमेदवार राहिला आहे.

बाद झालेले उमेदवार
पल्लोड स्मिता सुभाष, जोशी ज्योती दीपक, गोसावी ज्योती दीपक.गायकवाड छगननाना बापूसाहेब, जिरे पोपट हरिभाऊ, परदेशी कृष्णा पूनमसिंग, ताके अशोक दिनकर, शिंगवी निखिल सुनील, नळकांडे श्रीकांत अशोक, वाघ भाऊसाहेब मोहन, सावंत बाळासाहेब विठ्ठल दगडे मनीषा बाबासाहेब, बागवान युसुफ खुदबक्ष, लगे संतोष दिलीप, गायके मुक्ताबाई शांताराम, गायके मुक्ताबाई शांताराम, कनगरे भामाबाई भास्कर, शिंदे संजय तुकाराम, शिंदे संजय तुकाराम, आलवणे संदीप दिलीप, गव्हाणे सचिन रामदास, वाघ भाऊसाहेब मोहन डहाळे कमल ज्ञानदेवव्यवहारेगणेश प्रताप, गवळी जालिंदर मच्छिंद्र पवार शांताबाई अंबादास आदी. 

LEAVE A REPLY

*