नेवासा नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात

0

दोन प्रभागात दुरंगी, 6 प्रभागांत तिरंगी, 5 प्रभागात चौरंगी तर  4 प्रभागात बहुरंगी लढती

 

नेवासा (का. प्रतिनिधी)- येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी 12 प्रभागांची अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल शुक्रवारी उर्वरीत 5 प्रभागांची अर्ज मागे घेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असून आता एकूण 17 प्रभागांमध्ये 64 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
काल अर्ज राहिलेल्या पाच प्रभागांपैकी प्रभाग 1 मध्ये क्रांतीकारीच्या योगिता सतीश पिंपळे, मनसेच्या अर्चना संतोष गव्हाणे व भाजपच्या शरदिनी मधुकर देशपांडे या उमेदवार आहेत.
प्रभाग 3 मधून भाजपचे नितीन सुरेश दिनकर, क्रांतीकारीचे लक्ष्मण गणपत जगताप, राष्ट्रवादीचे विलास दत्तात्रय कडू, शिवसेनेचे कैलास पोपट जिरे तसेच जानकीराम घनश्याम डौले, निखील सुनील शिंगवी व बाळासाहेब विठ्ठल सावंत हे तीन अपक्षही नशिब अजमावत आहेत.
प्रभाग 11 मधून भाजपचे निरंजन कृष्णा डहाळे, क्रांतीकारीचे संदीप अण्णासाहेब बेहळे, शिवसेनेचे दीपक शंकर इरले, राष्ट्रवादीचे योगेश सुर्यकांत रासने व अपक्ष अनिस शफिक इनामदार हे उमेदवार आहेत.

 
प्रभाग 16 मध्ये क्रांतीकारीचे फारुक हाजीकासम आत्तार, भाजपचे वसिम गणी चौधरी व शिवसेनेचे माजी उपसरपंच गोरख लहानू घुले हे उमेदवार आहेत.
प्रभाग 17 मधून क्रांतीकारीच्या राणी किशोर बर्डे, भाजपच्या संगीता दत्तात्रय बर्डे, शिवसेनेच्या वर्षा मारुती पवार तर मनसेच्या आशा भाऊसाहेब पवार या उमेदवार आहेत.
एकूण 17 प्रभागांमध्ये क्रांतीकारी शेतकरी पक्ष सर्व प्रभागांमध्ये रिंगणात आहे. भाजपाचे उमेदवार 16 प्रभागांमध्ये आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने 9 प्रभागांमध्ये उमेदवार दिले आहेत. 3, 6, 7, 9, 10, 11, 13, 16 व 17 हे ते प्रभाग आहेत. राष्ट्रवादीने प्रभाग 3, 6 व 11 या तीन प्रभागांतून उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर मनसेने 1, 7 व 17 या तीन प्रभागांतून उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने प्रभाग 2 मधून शहराध्यक्ष संजय सुखदान यांच्या पत्नी शालिनी सुखदान यांंना उमेदवारी दिली असून या प्रभागात भाजपाने उमेदवार दिला नाही.

 

राजकीय पक्षांच्या वरील उमेदवारांशिवाय एकूण 15 अपक्षही रिंगणात असून त्यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य जानकीराम डौले (प्रभाग 3) व प्रभाग 12 मधून माजी सरपंच कांताबाई गायके यांचे पती सतीश देवराव गायके हे प्रमुख अपक्ष उमेदवार आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष पोपट जिरे यांचे चिरंजीव कैलास जिरे यांनी बंडखोरी करुन प्रभाग 3 मधून शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये प्रभाग 12 मधून क्रांतीकारी शेतकरी पक्षातून माजी सरपंच नंदकुमार पाटील उमेदवार आहेत. शिवसेनेचे शहर उपप्रमुख निरज नांगरे प्रभाग 9 मधून उमेदवार आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना आज शनिवारी चिन्ह वाटप केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*