नेवाळी विमानतळ : कल्याणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

0

नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरु आहे.

आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या.

इतकंच नाही तर पोलिसांवर दगडफेकही केली.

आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला.

ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे.

याला या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे

जवळपास या भागातील 7 ते 8 गावांची जमिनी ताब्यात घेतली आहे.

LEAVE A REPLY

*