नेप्तीच्या तमाशात गोंधळ; आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील नेप्ती येथे बिरोबाच्या जत्रेतील तमाशात गोंधळ झाल्याची घटना घडली. यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर संजय जपकर यांच्याकडील एक लाख 35 हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी आठ जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि.3) नगर तालुक्यातील नेप्ती येथे बिरोबाची जत्रा होती. रात्री तमाशा असल्यामुळे तेथे हजारो रंगप्रेमी आले होते. दरम्यान रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तमाशा सुरू असताना आरोपी सचिन बाळू जपकर, सौरभ छबू जपकर, नितीन बाळू जपकर, जालिंदर दगडू जपकर, छबू दगडू जपकर, अशोक आबा वाघ, गणेश आबा वाघ (सर्व रा. नेप्ती) व प्रतीक श्रीधर कोतकर (रा. केडगाव) यांनी कारण नसताना वाद सुरू केला.
दरम्यान प्रतीक गोरख जपकर हा वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच संजय जपकर यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यातील एक लाख 35 हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून नेली. हा प्रकार पोलिसांना समजला असता त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन दोन्ही गटांची समज काढली. याप्रकरणी संजय जपकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतभेद ग्रामसभेत मिटावेत…
दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सत्यता काय आहे, ती तपासली जाईल. मात्र ग्रामीण भागात जत्रा, उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रमात वाद घालणे योग्य नाही. कोणत्याही गावातील मतभेद ग्रामसभेत किंवा स्थानिक पातळीवर मिटविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाल्यास प्रत्येक गावात एकमेकांशी सलोख्याचे संबंध टिकून राहतील व गावाच्या विकासाला ते हिताचे ठरेल. – आनंद भोइटे (ग्रामीण पोलीस उपअधीक्षक)

LEAVE A REPLY

*