नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते

अरुणकाका जगताप : शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते. राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची रेंज वाढली असल्यांचे सांगत जगताप यांनी विरोधकांच्या खोड्याही कथन केल्या. आम्ही विकास कामांसाठी आणलेल्या निधीस हरकत घेण्याची त्यांची खोड जुनीच आहे. त्यांनी विकास कामांसाठी निधी आणूद दाखवावा असे आवाहन जगताप यांनी विरोधकांना दिले. अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते. राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची रेंज वाढली असल्यांचे सांगत जगताप यांनी विरोधकांच्या खोड्याही कथन केल्या. आम्ही विकास कामांसाठी आणलेल्या निधीस हरकत घेण्याची त्यांची खोड जुनीच आहे. त्यांनी विकास कामांसाठी निधी आणूद दाखवावा असे आवाहन जगताप यांनी विरोधकांना दिले. माळीवाडा, बारातोटी कारंजा येथील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, संभाजी पवार, संजय झिंजे, प्रा.अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे, हनिफ जरीवाला, ज्ञानदेव पांडूळे,  सुमतीलाल कोठारी, प्रा.शिवाजी विधाते, गजानन भांडवलकर, अमित खामकर, प्रकाश भागानगरे, ज्ञानेश्‍वर रासकर, दत्तात्रय राऊत, बाबासाहेब गाडळकर, वैभव ढाकणे, प्रा. भाऊसाहेब कचरे, अजय दिघे, मारुती पवार, रोहित शिंदे, साहेबान जहागीरदार, मयुर विधाते, पवन भिंगारदिवे, रेखा जरे, साधना बोरुडे, संजय सागावकर, अनिल विधाते, निलेश खरपुडे, फारुक रंगरेज उपस्थित होते.
अरुणकाका जगताप म्हणाले, शहराच्या विकासकामासाठी आणलेल्या निधीस विरोधकांनी हरकती घेतल्या. सत्ताधार्‍यांनी विकास कामासाठी अनुदान आणून दाखवावे. सर्वसामान्यांचे काम करणार्‍यांना जनता स्विकारते. कार्यकर्त्यांच्या जीवावर दुसर्‍यांदा विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. शहरात राष्ट्रवादीचे कार्य उत्तम चालू असल्याचे सांगत जगताप यांनी प्रा.विधाते यांच्या कार्याची प्रशंसा केली.
प्रास्ताविकात प्रा.माणिक विधाते यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून काम चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेक कळमकर म्हणाले की, मागील 25 वर्षाच्या जातीय राजकारणाने युवकांच्या आयुष्याचे वाटोळे झाल्याचे सांगत कळमकर यांनी अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. अविनाश घुले म्हणाले, विकास काय असतो, याची प्रचिती पंचवीस वर्षानंतर नगरकरांना पहावयास मिळाली, ती जगताप पिता-पुत्रांमुळेच.
दादाभाऊ कळमकर म्हणाले, जातीय राजकारणाद्वारे युवकांच्या माथी अजूनही दंगलीचे खटले आहे. तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम मागच्या 25 वर्षात झाले. एमआयडीसीतील कारखानदारी मोडीत काढण्याचे काम शिवसेनेने केले. 25 वर्षे मागे वळून पाहताना शहरातील हजारो युवक बेरोजगारीच्या खाईत लोटल्याचे वास्तव चित्र सर्वांपुढे आहे. आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून व राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली व चालू देखील आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम सत्ताधारी करत आहे. राज्यासह केंद्रात सत्ता नसताना देखील विकासात्मक कामे आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून होत असून, सेना-भाजप मात्र आरोप प्रत्यारोपातच गुंतले असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी आसाराम रासकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नागेश गवळी यांनी केले. प्रकाश भागानगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*