‘नेटकर्‍यां’साठी पोलिसांची शाळा

0

सोशल मीडिया व्हॅनद्वारे जागृती, शर्मा यांचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना लुटले जात आहे. तसेच बँकींग क्षेत्रातही फसवणुक केली जात आहे. ‘नेटकर्‍यांना’ जागृत करण्यासाठी शहरात ठिकाणी सोशल मीडिया व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील शाळा, सार्वजानिक ठिकाणे, बाजारपेठ येथे ‘नेटकर्‍यांसाठी’ विविध उपक्रम घेण्यात येणार आहे.
नेट बँकींगच्या माध्यमातून शहरात हजारो लोकांना कोट्यावधी रूपयांना लुटले आहे. बँकेचा कर्मचारी, व्यावस्थपक बोलतो, असे म्हणुन ग्राहकांना पिनकोड, आधारकार्ड नंबर, ओटीपी नंबर, खाते क्रमांक मागितला जातो. या नंबरच्या माध्यमातून लाखो रूपयांची फसवणुक केली जाते. या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या प्रकारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
स्थनिक प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, शाळा यांच्या माध्यमातून जानजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पालक आपल्या मुलांना मोबाईल देतात, मुलांना इंटरनेटचे जास्त ज्ञान नसते त्यामुळे ते अन्य मित्रांची मदत घेतात. त्यावर व्हाटसऍप, फेसबुक, ट्विटर अशा प्रकारचे सोशल मीडियाचे ऍप घेतात. त्याचा पासवर्ड मित्राकडे असल्यामुळे तो त्या पासवर्डच्या सहायाने बनविलेल्या इमेल-आयडीचा गैरवापर करतात. त्यामुळे सायबर गुन्हे दाखल होता. सद्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडण्याची शक्यता आहे. तसेच नेट बँकींगचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. नगर जिल्ह्यात असे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शर्मा यांनी सायबर शाखेला पाठबळ देऊन सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पालकांनी मुलांना मोबाईल देताना तो नेहमी तपासला पाहिजे. त्यावरील इमेल, व्हाटसऍप, फेसबुक यांचा पासवर्ड नेहमी बदलला पाहिजे. कोणाच्या भावना दुखतील किंवा नको त्या गृपचे सदस्य होण्यापासून टाळले पाहिजे. नेट बँकींग संदर्भात थेट बँकेशी संपर्क साधावा. चुकीच्या वेबसाईटला भेटी देऊन माहिती अपलोड करू नये.
– किर्ती पाटील (सायबर सेल शाखा)

LEAVE A REPLY

*