नॅशनल हेराल्ड प्रकरण: सोनिया-राहुल गांधींची आयकर विभागाला चौकशी करण्याचे आदेश

0

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे.

याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत. यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तपासणीचे आदेश दिल्ली उच्चालयाने दिले आहेत.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी या कंपनीत संचालक असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. याआधी पटियाला उच्च न्यायालयाने राहुल आणि सोनिया गांधी यांना फसवणुकीचे षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

यंग इंडियाने केवळ ५० लाख रुपयांच्या बदल्यात एसोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर आहे.

LEAVE A REPLY

*