‘नीरजा’च्या कुटुंबियांचा निर्मात्यांवर गुन्हा दाखल

0

गेल्या वर्षी ‘नीरजा’ सिनेमाने जगभरात १२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

या सिनेमाला फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली.

६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा तसेच इतर पुरस्कारांवरही या सिनेमाने आपले नाव कोरले होते. पण आता या सिनेमाच्या नफ्यावरून नीरजाचे कुटुंबिय आणि निर्माते समोरा समोर आले आहेत.

‘सिनेमाच्या नफ्याचा १० टक्के भाग देण्याचे वचन निर्मात्यांनी दिले होते. पण अजूनपर्यंत आम्हाला तो हिस्सा मिळाला नाही,’ असे नीरजाच्या कुटुंबियांनी सांगितले. पण फॉक्स स्टार इंडियामुळे नफ्याचा आकडा कमी झाल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आता नीरजा भनोटचे कुटुंबिय ‘ब्लिंग एण्टरटेनमेंट’ला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात खेचण्याच्या विचारात आहेत.

त्यांनी याबाबत निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.

 

LEAVE A REPLY

*