निवडणूक आयोगाचे अभियान : मतदार नोंदणीसाठी फेसबुकची मदत

0

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने नव मतदार नोंदणीसाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी फेसबुकच्या मदतीने व्होटर्स रजिस्ट्रेशन रिमायंडर सुरू केले जाणार आहे. अधिकृत निवेदनानुसार, 1 जुलैपासून फेसबुकवर मतदार बनण्यासाठी पात्र लोकांनी व्होटर रजिस्ट्रेशन रिमायंडर संदेश पाठवण्यात येणार आहे.
हा रिमांयडर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उर्दू, आसामी आणि उडिया या भाषेत असेल. लोकांना रजिस्टर नाऊ बटनवर जाऊन क्लिक केल्यानंतर नॅशनल सर्व्हिस पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथे त्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी सूचना दिल्या जातील. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदींनी या अभियानावर समाधान व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाचा उद्देश पूर्ण करण्यासाठीचे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
मी सर्व पात्र नागरिकांना नोंदणी आणि मतदानासाठी आवाहन करतो. यामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी अभियानाला बळकटी मिळेल. भावी मतदारांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन भारताची जबाबदार लोकशाही बनवण्यास प्रोत्साहित करेल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*