निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेवाशात 9 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

0

नेवासा (का. प्रतिनिधी) – नेवासा येथे होत असलेल्या नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी नेवासा पोलिसांनी शहरातील 9 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

 
पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्या फिर्यादीवरुन कैलास पोपट जिरे, नानासाहेब सोमनाथ ठाकर, अनिल शिवाजी मोरे, बाळू सोन्याबापू जाधव, अजय बापूसाहेब कापडे, दिलीप दामोधर गायकवाड, बादल कैलास परदेशी, राजू बारकू देवकाते या 8 जणांवर तर पोलीस नाईक मोढवे यांच्या फिर्यादीवरुन बाळासाहेब शिवाजी गोरे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 

वेळोवेळी दारु विकून दहशत धाक व दडपणाच्या तक्रारी आल्याने निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबई प्रोव्हीशन कायदा 65 ई प्रमाणे या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*