निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांसाठी 22 कोटी मंजूर : जालिंदर वाकचौरे

0

अकोले ( प्रतिनिधी) – निळवंडे धरणाचे उच्चस्तरीय कालव्याच्या प्रश्न मार्गी लागला असून त्यासाठी 22 कोटी रुपये निधी सरकारने मंजूर केला असून पालकमंत्री ना .राम शिंदे यांनी केलेले विशेष प्रयत्नामुळे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी हा निधी वर्ग केला आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली.

 
प्रवरा नदी लाभक्षेत्रात असलेली गावे परंतु पाण्यापासून वंचित राहणारी गावे त्यामध्ये कुंभेफळ, तांभोळ, गर्दनी, टाकळी , ढोकरी , अंबिकानगर, बहिरवाडी, मेहंदुरी , उंचखडक , अंबड , धामणगाव आवारी , परखतपूर , वाशेरे , मनोहरपूर , कळस खुर्द व बुद्रुक या गावांना या उच्चस्तरीय कालव्याचा फायदा होणार आहे. यासाठी तालुक्यातील विरोधी असणारे भाजप, शिवसेना, माकप, रिपाइं यांनी आंदोलन करून कालव्याना मंजुरी मिळवली .मागील सरकारने मंजुरी दिली मात्र निधी दिला नाही त्यामुळे ही कामे रखडली होती.

 

 

पावसाळ्यात धरण भरल्यानंतर या पाण्यातून गावचे बंधारे भरले जाणार आहेत ,त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढली जाणार आहे.पर्यायाने शेतकरी वर्ग सुखी होईल असे वाकचौरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*