निळवंडेचे पाणी थेट अकोलेत

0

अकोलेकरांनी केला जल्लोष

अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे धरणातून अकोले शहरासह 32 गाव पाणीपुरवठा योजनेची चाचणी अकोलेत नुकतीच यशस्वी झाली. या योजनेचे पाणी अखेर अकोले शहरात पोहोचले. त्यामुळे अकोलेकरांनी या पाण्याचे जल्लोषात स्वागत केले.
निळवंडे धरणातून अकोले शहर व 32 गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले होते. या योजनेचे पाणी अकोले व 32 गावांना कधी मिळणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी आग्रह धरला होता.
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, नगराध्यक्ष वकील के. डी. धुमाळ, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, उपनगराध्यक्ष प्रकाश  नाईकवाडी, नगरसेवक बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, परशुराम शेळके, नामदेव पिचड, विजय सारडा, सुरेश लोखंडे, प्रमोद मंडलिक, शबाना शेख, कीर्ती गायकवाड, स्वाती शेणकर, अनिता गायकवाड, सुभद्रा नाईकवाडी, संगीता शेटे, विमल भोईर, कल्पना चौधरी, निशिगंधा नाईकवाडी, सोनाली नाईकवाडी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंना एन. व्ही. कुलकर्णी, शाखा अभियंता एम. पी. बिन्नर, मेगा कंपनीचे मॅनेजर संदीप मंडलिक, अकोले व 32 गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष संपतराव नाईकवाडी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच शाहूनगर परिसरातील अकोले नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभात हे पाणी सोडण्यात आले.
यावेळी शहरवासीयांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून तब्बल 40 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. अकोले शहर व 32 गावांसाठीची लोकवर्गणीही पिचड यांनी त्यावेळी माफ करून आणली होती. आघाडी सरकारच्या काळात या योजनेच्या कामाला गती देण्यात आली. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून या कामाची गती मंदावली होती. परंतु आ. वैभवराव पिचड यांनी यासाठी पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत धरणस्थळावर जलशुद्धीकरण प्रकल्प असून पाणी शुद्ध करून ते गावांना दिले जाणार आहे. तिथे सुमारे साडेअकरा लाख लीटरची 20 मीटर उंचीची टाकी आहे. निळवंडे धरणापासून कळसपर्यंत 14 किमी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. याची चाचणी यशस्वी पार पडली.

थेट धरणातून पुरवठा
निळवंडे, सावंतवाडी, रुंभोडी, इंदोरी व औरंगपूर या गावांना पुढील 10 दिवसांत पाणीपुरवठा सुरू होईल. उर्वरित गावांना मात्र योजनेच्या सुधारित प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यानंतरच पाणी मिळणार आहे. अकोले शहारासह रुंभोडी, सावंतवाडी, इंदोरी, आंबड, धामणगाव आवारी, औरंगपूर, उंचखडक बुद्रुक, नवलेवाडी, धुमाळवाडी, अगस्ती नगर, परखतपूर, वाशेरे, मनोहरपूर, सुगाव बुद्रुक, सुलतानपूर, निंब्रळ, निळवंडे, म्हाळादेवी, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द, अंबिकानगर, ढोक्री, टाकळी, आगर, खानापूर, गर्दनी, रेडे, तांभोळ, सुगाव खुर्द, कुंभेफळ, कळस खुर्द या गावांना निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होणार आहे.

LEAVE A REPLY

*