नाशिक विभागात 114 टँकरद्वारे पाणी पुरवठा

उन्हाचा तडाखा वाढत असताना नगर, नाशिक जिल्हयातील टँकरच्या संख्येत वाढ

0
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे नाशिक विभागातील टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिक विभागात नाशिक, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यातील 125 गावे व 216 वाडयांना 114 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

त्यात नाशिक जिल्ह्यातील 53 गावे व 34 वाडयांचा समावेश आहे. त्यांना 40 टँकरने पाणी दिले जात आहे. तर नगर जिल्हयात सर्वाधिक 54 टँकरव्दारे पाणीपूरवठा करण्यात येत आहे.

महिनाभरापासून दिवसागणिक वाढणार्‍या तापमानाने पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मध्यंतरी ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीने उष्म्यात अधिकच वाढ झाली. उत्तर महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यात शहरात फारसे नसले तरी ग्रामीण भागात भारनियमन वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रणरणत्या उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोतातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मेच्या सुरूवातीला पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्याने टँकरची मागणीही वाढू लागली आहे.धुळे जिल्हयातील 13 गावांना 11 टँकरने पाणी पुरवठा करत आहे.

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक 12 टँकरव्दारे पाणीपूरवठा करण्यात येत आहे. जळगांव जिल्हयातील 17 गावांना 9 टँकर तर अहमदनगर जिल्हयात 43 गावे आणि 182 पाडयांना 54 टँकरव्दारे पाणीपूरवठा करण्यात येत आहे.

विभागात एकूण 61 शासकिय आणि 37 खाजगी टँकरव्दारे पाणीपूरवठा करण्यात येत आहे. दारणा धरणातून दोन दिवसांपूर्वीच सिंचन आणि बिगर सिंचनाचे पाणी सोडण्यात आल्याने टंचाईचा दाह काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*