नाशिक जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना स्मार्टग्राम पुरस्कार

0

नाशिक : महाराष्ट्र दिननिमित्त पोलिस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना स्मार्टग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सरपंचांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार सिमा हिरे, बाळासाहेब सानप, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. जि.प.सीईओ मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्मार्टग्राम योजनेतंर्गत स्मार्ट ग्रामपंचायती म्हणून ज्या 15 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या त्यात बागलाण तालुक्यातील किकवारी,

चांदवड मधील राजदेरवाडी, दिंडोरीतील लखमापूर, देवळा तालुक्यातील कणकापूर, कळवणमधील पाळे, मालेगावमधील सातमाने, नादंगाव तालुक्यातील बोराळे,नाशिकमधील सैय्यद प्रिंपी,

निफाड तालुक्यातील करंजगाव, पेठ तालुक्यातील हनुमाननगर, सुरगाणातील घोडांबे, सिन्नर मधील माळेगाव, त्र्यंबकमधील तोरंगण आणि येवला येथील उंदिरवाडी या गावांचा समावेश आहे. मान्यवरांच्या हस्ते या ग्रामपंचायतींच्या सरपंचाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

*