‘नामकरण’ मालिकेत रिमा लागूंच्या ‘एक्झिट’मुळे रागिणी शाह यांची ‘एण्ट्री’

0

हिंदी आणि मराठी चित्रपट, नाट्य आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील चतुरस्र अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

रिमाताई स्टार प्लस वाहिनीवरील ‘नामकरण’ मालिकेत काम करत होत्या. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.

त्यांना श्रद्धांजली म्हणून ‘नामकरण’च्या निर्मात्यांनी गुरुवारचे चित्रीकरणही रद्द केले होते.

निर्मात्यांनी लगेचच रिमाताई साकारत असलेल्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड केली आहे. रिमाताई ‘नामकरण’ मालिकेत ‘दयावंती बेन’ची व्यक्तिरेखा साकारत होत्या.

त्यांची जागा आता अभिनेत्री रागिणी शाह घेणार असल्याचे कळते. रागिणी शाह याआधी ‘सरस्वतीचंद्र’ आणि ‘दिया और बाती हम’ मालिकांमध्ये झळकल्या आहेत. आता त्यांनी ‘नामकरण’च्या चित्रीकरणालाही सुरुवात केल्याचे कळते.

 

LEAVE A REPLY

*