नांदूर मधमेश्वरच्या पाण्यासाठी फाशी घेण्याचा प्रयत्न

0

वैजापुरात 170  उपोषणार्थींची अटक करून सुटका

 

वैजापूर (प्रतिनिधी)- नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणार्थींनी अचानक रस्सी हातात घेऊन फाशी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सतर्कता दाखवून तात्काळ रस्सी हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी 170 उपोषणार्थींची अटक करून सुटका केली.

 
नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी आवर्तन सोडण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी 11 मेपासून येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी उपोषण सुरू केले होते. शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता.

 

उपविभागीय अधिकारी संदीपान सानप व तहसिलदार सुमन मोरे यांच्यासह नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या अधिका-यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन येत्या 16 मे रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे उपोषण मागे घ्या अशी विनंतीही उपोषणार्थींना केली. परंतु उपोषणार्थींनी प्रशासनाच्या विनंतीस कोणताही प्रतिसाद न देता उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.

 

त्यामुळे संबंधित अधिकारी उपोषणस्थळावरून निघून गेल्यानंतर मपाणी द्या अथवा आम्हाला फाशी घेऊ द्याफ अशी जोरदार घोषणाबाजी उपोषणार्थींनी सुरु केली. नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याची चिन्हे दिसत नसल्याने उपोषणार्थींच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. पाणी न सोडल्यास 12 मे रोजी आत्मदहन अथवा फाशी घेण्याचा इशारा उपोषणार्थींनी प्रशासनास दिला होता.

 

त्यामुळे दुपारच्या सुमारास उपोषणार्थींनी अचानक रस्सीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून उपोषणार्थींना रोखले. त्यानंतर उपोषणार्थींची उचलबांगडी करून पोलिसांनी त्यांना अटक करून नंतर सुटका केली. तत्पूर्वी पोलिसांनी उपोषणार्थींजवळ असलेली रस्सी व उपरणे हिसकावून घेतले होते.यावेळी संतोष सोमवंशी, राजेद्र थोरात, संत्याजीत सोमवंशी, ज्ञानदेव कदम, सुर्य पवार, पंडीत शिदे, रवि निकम, दत्ता धुमाळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*