नव्या तंत्रज्ञानामुळे पेट्रोल ३० रुपये लिटर होईल : अमेरिकेचे प्रख्यात भविष्यवेत्ते टोनी सीबा

0

अमेरिकेचे प्रख्यात भविष्यवेत्ते टोनी सीबा यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील येत्या काळातील बदल लक्षात घेऊन ५ वर्षांमध्ये पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील, असा दावा केला आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टोनी सीबा सिलिकॉन व्ह्रॅलीतील एक मोठे व्यावसायिक आहेत.

यासोबतच सीबा स्टॅनफोर्ड महाविद्यालयात अपारंपारिक ऊर्जेशी संबंधित विषयांचा अभ्यास करतात.

‘स्वयंचलित वाहनांमुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये घट होईल. त्यामुळे तेलाचे दर २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील,’ असे टोनी सीबा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*