‘नमक हलाल’ पुन्हा रिलीज होणार

0

प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बाबी आणि वहिदा रेहमान या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीही पाहायला मिळाली होती.

असा हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार असून प्रेक्षकांना गतकाळाची सफर घडवणार आहे.

‘नमक हलाल’ प्रदर्शित होऊन ३५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘शेमारू एण्टरटेन्मेन्ट लिमिटेड’ आणि ‘वीकेएएओ’ यांनी एकत्र येऊन हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ मे रोजी या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे.

‘वीएकेकेओ’च्या माध्यमातून प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजनही प्रेक्षक करु शकणार आहेत.

याविषयीची अधिक माहिती देत पीव्हीआर पिक्चर्सचे सीईओ कमल ज्ञानचंदानी म्हणाले, ‘जुन्या चित्रपटांचं पुन्हा नव्याने स्क्रीनिंग करण्याची संकल्पना परदेशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हीच संकल्पना आपल्या इथेही रुळली पाहिजे.’ यावेळी ज्ञानचंदानी यांनी प्रेक्षकांसमोर काही सुरेख चित्रपटांचा नजराणा सादर करण्याच्या या संकल्पनेचे महत्त्वंही मांडले.

LEAVE A REPLY

*