नगरचे 10 पोलीस कर्मचारी झाले ‘पीएसआय’

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात पोलीस खात्याअंतर्गत पोलीस कॅन्स्टेबल ते पीएसआय या 828 पदासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये परिक्षा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नगरच्या 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. त्यात सामान्य कुटुंबातील दहा कॉन्स्टेबल पोलीस उपनिरीक्षक म्हणून पात्र ठरले आहेत.

 
पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, यु. के. साठे, डी. आर. साळवे, ए. एन. गर्जे, सी. बी हंडाळ, एस. झेड. शेख, एस. शिरसाठ, सागर काळे, पीएसआय नेहे, पीएसआय भवर अशा दहा जणांनी या परिक्षेत यश संपादन केले आहे. राज्य सेवेच्या परिक्षेप्रमाणे खात्याअंतर्गत परिक्षे घेण्यात आल्या होत्या. 828 जागांसाठी 45 हजार अर्ज आले होते. त्यातील 33 हजार 388 उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले तर अन्य पोलीस नापास झाले.

 

पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यातील 828 उमेदवारांचा निकाल शुक्रवारी (दि.5) लागला. त्यात नगरचे शेतकरी व सामान्य कुटुंबातील 10 पोलीस कर्मचारी पीएसआय झाले आहे. त्यामुळे त्याचे पोलीस अधिकार्‍यांकडून स्वागत केले जात आहे.

 

…हे अधिकारी आदर्श काम करतील
पोलीस खात्यात राहुन जिद्दी चिकाटीसह चांगले काम केले त्याचे हे यश आहे. ज्या गरीब कुटुंबातून हे अधिकारी झाले, त्याची जाण ठेऊन यांनी पुढे काम करावे. पोलीस खात्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहुन त्यांनी ते सत्यात उतरविले. हे सर्व अधिकारी समाजासाठी आदर्श काम करतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील कार्यास पोलीस दलाकडून शुभेच्छा आहे.
– चिन्मय पंडीत (सहायक पोलीस अधिक्षक)

LEAVE A REPLY

*