‘नंदनवन’ माहितीपटाचे आज सह्याद्री वाहिनीवर प्रसारण

0

नंदुरबार /राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असून,

2017 हे वर्ष व्हीजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून शासनामार्फत साजरे केले जात आहे.

याचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पर्यटनावर आधारित नंदनवन या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे .

या माहितीपटाचे प्रसारण 4 मे रोजी रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

सुमारे 30 मिनिटांच्या या माहितीपटाची निर्मिती पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनमान्य यादीवरील माहितीपट निर्माता ब्रिज कम्युनिकेशन जळगाव यांनी केली आहे.

या माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांची आहे .

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन रात्री दहा ते साडेदहा या वेळेत या माहितीपटाचे प्रसारण केले जाणार आहे.

या माहितीपटात जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेली प्रसिध्द पर्यटनस्थळे व पर्यटनाला चालना देणार्‍या पर्यटनस्थळांच्या माहितीचा समावेश असल्याने हा माहितीपट जिल्हावासीयांनी अवश्य पाहावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*