धूमस्टाईलने 2 लाख 3 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

0

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील गणेशनगर परिसरात रस्त्याच्या कडेला कारशेजारी उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावरील दोन लाख 3 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने धूमस्टाईलने लांबविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

 

 
संध्या किरण अरगडे (रा. माऊली कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) या गणेशनगर परिसरात आल्या होत्या. सायंकाळच्यावेळी त्या त्यांच्या कारशेजारी उभ्या असताना अचानक धूमस्टाईलने मोटारसायकलहून दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण व दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस हिसकावून पोबारा केला.

 

 

सुमारे 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद संध्या अरगडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 122/17 भारतीय दंड संहिता 392, 34 प्रमाणे दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहेत.

LEAVE A REPLY

*