धांदरफळ बुद्रूकच्या सिंधूताई तोरकडी यांना राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्रदान

0

धांदरफळ (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्या तथा सरपंच सिंधूताई माधव तोरकडी यांना कोल्हापूर येथील जनकल्याण संस्थेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

कोल्हापूर येथील स्मुर्ती हॉल येथे जनकल्याण सामाजिक सेवा संस्था आयोजित पुरस्कार प्रदान समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी आदर्श महिला सरपंच म्हणून संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुकच्या सरपंच सिंधूताई माधव तोरकडी यांना माजी मंत्री अण्णा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी दीपक शांताराम होते तर भगवान कोकरे महाराज, बबनराव महाराज साप्ते, रामायणाचार्य विश्‍वनाथ महाराज वारिंगे, संगीता पाटील, संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

 

धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेशराव खुर्पे, अशोकराव वलवे, रोहिदास डेरे, अनिलराव कासार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने सत्तांतर करत सरपंचपदी सिंधूताई तोरकडी व उपसरपंचपदी वकील अविनाश वलवे यांची निवड झाली.

 

 

सौ. तोरकडी यांनी पाच वर्षात गावात विविध विकास कामे करत आदर्शवत कारभार केला. गावविकासामध्ये उपसरपंच अविनाश वलवे, मारुती कोल्हे, ग्रामसेवक गोकुळ वर्पे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

*