‘द कपिल शर्मा शो’साठी आणखी दोन महिन्यांची मुदत

0

घसरत्या टीआरपीमुळे ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची चर्चा होती. पण, कपिलला अजून दोन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने पुढचे काही दिवस तरी तो लोकांचे मनोरंजन करू शकणार आहे.

या शोच्या जागी नंतर सलमानचा ‘दस का दम’ हा कार्यक्रम जागा घेईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः सलमानच करणार आहे.

सध्या सलमान ‘ट्युबलाइट’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांच्या कामात असल्यामुळे त्याच्या या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

सलमानने कतरिना कैफसोबत ‘टायगर जिंदा है’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘दस का दम’ पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात सुरु होईल.

केवळ सलमानकडे तारखा नसल्यामुळेच सोनी वाहिनीने कपिलला त्याचा शो सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*