दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ला आग; जीवितहानी नाही

0

जगातील सर्वात उंच दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ला आग लागली होती.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवण्यात यश आलं आहे.

79 मजली इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

रात्री एकच्या सुमारास 67 व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे.

शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर इमारतीतील रहिवाश्यांना अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढलं.

दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.

इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. 2015 मध्ये आग लागली, त्यावेळी शेकडो रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

*