दुकानांमध्ये लगबग, भेटवस्तूंचा बाजार सजला

0

नाशिक, दि.3 प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फे्रंडशिप डे साजरा केला जातो. यंदाही या दिवसाच्या तयारीसाठी बाजारपेठ सजताना दिसत आहे.

भेटवस्तूंच्या दुकानात त्याची झलक पहायला मिळत असून, नवनव्या वस्तूंनी दुकानांच्या भिंती सजल्या आहेत.

फे्रेडशिप डे म्हटला की तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्यातच पहिल्यांदाच कॉलेज पाहिलेल्या किंवा शिकत असलेल्या मुलांमध्ये या दिवसाविषयी प्रचंड आकर्षण असते.

त्यामुळे काही जण या दिवसाची खूप आधीपासून तयारी करतात. मित्र दिवस असल्याने आपल्या आवडत्या मित्राला अथवा मैत्रीणीला भेट देण्याची परंपरा या दिवसाने घालून दिलेली आहे.

त्यामुळेच काही का असेना परंतु आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला भेट देण्यासाठी तरुणांची अक्षरश: झुंबड दुकानांमधून उडतांना दिसते. या दिवसाचे औचित्य साधून दुकानेही जय्यत तयारी करतात.

मित्र दिवसाला भेट म्हणून नाशिकच्या बाजारातही अनेक तर्‍हेच्या वस्तू विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत.

अगदी कटलरीपासून, शोभेच्या वस्तू, नॉव्हेेल्टी, मोबाईल, कपडे, ब्रॅडेंड घड्याळ, इलेक्ट्रॉनिक साहित्य, सोने-चांदीच्या वस्तू आदी सर्वच वस्तू या दुकानांंमध्ये विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.

याशिवाय चॉकलेटस किंवा म्युझिकल इन्स्ट्रूमेंट, मेक अपचे साहित्य, विविध प्रकारचे अत्तर याशिवाय अन्य गृहोपयोगी वस्तू आदी सर्वच साहित्य मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.

शहरातील दुकानांमध्ये फेरफटका मारल्यास फ्रेडशिप डेचा फिव्हर पहायला मिळतो. रविवारसाठी तीन ते चार दिवस शिल्लक असले तरी आतापासूनच त्याची तयारी करण्यात येत आहे.

शहरातील मेन रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोडवरील दुकाने असोत वा सिडको, नाशिक रोड आदी दुकाने असोत अथवा मॉल अशा सर्वच ठिकाणी फे्रंडशिप डेसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळते.

केवळ तयारीच नव्हे तर जास्तीत जास्त तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध वस्तूंवर भरघोस सूट जाहीर करण्यात आलेली आहे.

याशिवाय काही ठिकाणी कॅशबॅक तसेच अन्य गिफट देण्यात येत आहेत. रविवारपर्यंत ही सूट राहणार आहे. विशेष करून शहरातील महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डे साठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

*