दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर!

0

मुंबई – सुपरस्टार दिलीप कुमार यांची प्रकृती काल अचानक बिघडली आणि त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल केले गेले.

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे.

त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी आज सकाळी ही माहिती दिली. दिलीप कुमार यांना डिहायड्रेशनमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तथापि पुढील दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येईल, असे रूग्णालयाने म्हटले आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यातही त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मधुमती, मुघल-ए-आजम, देवदास, गंगा जमुना, राम और श्याम आणि कर्मा अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या त्यांच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी 1944 मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली.

तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले.

LEAVE A REPLY

*