दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू मध्ये अमिताभ बच्चन झळकणार

0

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे प्रत्येकाचे स्वप्न असते.

बडे बडे दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात.

दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सुद्धा याला अपवाद नाही. पण आता यासाठी फार प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण लवकरच नागराज मंजुळे व अमिताभ बच्चन एकत्र येत आहेत. होय,‘सैराट’फेम नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत आणि आपल्या पहिल्या बॉलिवूडपटासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे.

या चित्रपटाबद्दल नागराज व अमिताभ यांच्यात गत दीड वर्षांपासून चर्चा सुरु आहे. गत जानेवारीत ही चर्चा फळास आली आणि नागराज यांनी अमिताभ यांना आपल्या चित्रपटासाठी साईन केले.

लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. नागराज यांचा हा चित्रपट एका सामाजिक मुद्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

*