दारणात धुव्वाधार पाऊस

0

670 दलघफू नवीन पाणी, साठा झाला दीड टीएमसी

 

अस्तगाव (वार्ताहर)- घोटी, इगतपुरी परिसरातील धुव्वाधार पावसाने दारणा धरणात 24 तासांत 670 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. 7149 क्षमतेच्या या धरणात 1420 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या धरणात दीड टीएमसी पाणीसाठा झाला होता. शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी नवीन पाण्याची आवक सुरुच आहे.

 

 

दारणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 41 मिमि, घोटी येथे 119 मिमि, इगतपुरी येथे 138 मिमि असा धुव्वाधार पाऊस पडला. त्यामुळे या गुरुवारी सकाळी 750 दशलक्ष घनफूट असलेला साठा शुक्रवारी सकाळी 1420 दशलक्ष घनफुटावर पोहचला होता.

 

 

हे धरण 19.86 टक्के भरले होते. उपयुक्त शून्य साठा पावसाळ्यापूर्वी असणार्‍या भावली धरणात काल सकाळ अखेर 435 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. 1434 क्षमतेच्या या धरणात 435 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. हे धरण 30.32 टक्के भरले आहे. भावलीच्या परिसरात काल सकाळ पर्यंत संपलेल्या 24 तासांत 118 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या धरणातही पाण्याची आवक चांगली होत आहे.

 

 

गंगापूर धरणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 56 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. काल सकाळी 6 पर्यंतच्या 24 तासांत या धरणाच्या भिंतीजवळ 36 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोली येथे 76 मिमी, त्रंबक येथे 38 मिमी, नाशिक येथे 17 मिमी पावसाची नोंद झाली. 5630 क्षमतेच्या या धरणात 24.10 टक्के पाणीसाठा आहे.

 

 

अन्य धरणांमधील पाणीसाठा (टक्के)
कडवा 4.49, आळंदी 3. 11, काश्यपी 22.62, वालदेवी 4.85, गौतमी 8.08 असा साठा आहे.
काल सकाळी 6 वाजे पर्यंत 24 तासात नोंदलेला पाऊस असा- मधमेश्‍वर 4 कडवा 50, मुकणे 50, काश्यपी 30, गौतमी 30 मिमी.

LEAVE A REPLY

*