दानवेंच्या पुतळ्याचे दहन

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– तूर खरेदीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबद्दल वापरलेल्या असंसदीय भाषेचा निषेध अहमदनगर शहर शिवसेनेने केला.

दानवे यांचा पुतळाही सेनेने यश पॅलेस चौकात जाळला. दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष व खासदार पदाचा राजीनामा देण्याची मागणी सेनेने यावेळी केली.

सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने सकाळी यश पॅलेस चौकात हे आंदोलन केले.
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच शासनाने तूर खरेदी बंद केली. शेतकर्‍यांची लाखो टन तूर बाजार समितीच्या आवारात पडून आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असताना शासन तूर खरेदीबाबत उदासिनता दाखवित आहे. असे असतानाही प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जालना येथे शेतकर्‍यांबद्दल असंसदीय शब्द वापरले. त्याचा निषेध म्हणून अहमदनगर शहर सेनेने दानवे यांचा पुतळा जाळला. शेतकर्‍यांबद्द यापुढे काही बोलाल तर सेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा सेनेचे जिल्हाध्यक्ष गाडे यांनी यावेळी दिला. शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, रामदास भोर, संदीप गुंड, प्रवीण कोकरे, राजू भगत यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*