दहशतवाद्यांकडून बीएसएफ टॉपरला धमकी, केंद्र सरकारला पत्र

0

दहशतवाद्यांकडून मला आणि चंदीगडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या माझ्या बहिणीला धमकावले जात असल्याचे बीएसएफ परीक्षेत अव्वल आलेला असिस्टंट कमांडंट (सहायक सेनानायक) नबील अहमद वानी यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे

लेफ्टनंट उमर फयाजच्या हत्येनंतर कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

चंदीगडमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये शिकत असलेली त्याची बहिण महाविद्यालयातील वसतिगृहात राहते. दहशतवाद्यांकडून धमकावले जात असल्याने महाविद्यालय व्यवस्थापनाने तिला दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितले आहे, असेही वानीने पत्रात म्हटले आहे.

वानीने १४ मे रोजी महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांना पत्र पाठवून बहिण निदा रफीकच्या राहण्याची व्यवस्था वसतिगृहात करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

काश्मिरी असल्याने चिंता वाटते आहे. विशेषतः माझ्या जन्मभूमीमुळे मला राहायला जागा मिळत नसल्याने चिंतातूर झालो आहे. ही बाब खासगी असली तरी यात मी बीएसएफला आणणार नाही. त्यामुळे यासंबंधी संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली आहे, असेही वानीने सांगितले.

LEAVE A REPLY

*