दरोड्याच्या साहित्यासह नगरची टोळी पकडली

0
अहमदनगर (प्रतिनिधी) –विविध हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीच्या एमआयडीसी पोलिसांनी रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या. या टोळीतील आरोपींना रविवार न्यायालयात उभे केले असता बुधवारपर्यंत (दि. 17) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी पहाटे 3 च्या सुमारास एमआयडीसी नागापूर, नगर जिमखाना ते गांधीनगर बोल्हेगावकडे जाणार्‍या रस्त्यावर सैफ उर्फ शमसुद्दीन सय्यद (वय-26 रा) बोल्हेगाव गावठाण, प्रदीप कचरू वारे (वय 19) बोल्हेगाव, अश्पाक राजू शेख (वय 20, बोल्हेगाव), राजेंद्र सुपेकर जगताप (वय 29, बोल्हेगाव), इम्रान करिम पठाण (वय 35, रा. बोल्हेगाव) यांना पोलिसांनी पकडले. यावेळी या पाच जणांकडे 35 सेमी लांबीची फायबर काठी, लांब धारदार कुर्‍हाड, 20 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल, लोखंडी धारदार टोचा, पांढर्‍या रंगाचा सुती दोर, 2 अ‍ॅक्टिव्हा वाहने (क्रमांक एमएच 16 एक्स 9020 आणि एमएच 16 एझेड 3230) असा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांच्या माहितीनुसार हे पाचही आरोपी दरोड्याच्या तयारीत असताना त्यांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. एमआयडी पोलीस ठाण्याचे प्रभारी साहयक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी ही कामगिरी बजावली.
आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*