दरोडेखोरांची टोळी जेरबंद

0

राहुरी पोलिसांची कामगिरी , गावठी कट्ट्यासह सहा लाख जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात पोलीस पथकाने सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमालसह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
बाळासाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे, शंकर शामराव काळे, योगेश राजेंद्र जाधव, संदीप सुभाष नागुडे, रामनाथ शामराव मोरे (सर्व रा.शिंगवे), रुपेश बाळासाहेब लांडगे (रा.देहरे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राहुरी पोलीस गुरूवारी राहुरी तालुक्यातील खांडावा परिसरात रात्रगस्त घालत होते. काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली. त्यांनी पथकाला सुचना देत स्वत:च दरोडेखोरांचा मागमूस कढण्यास सुरूवात केली. खंडाबे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेले सहा जण पोलिसांना मिळाले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांकडे पोलिसांनी विचारपूस केली मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळाल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्ट्यासह लाकडी दांडके, मिरची पूड मिळाली. यासह स्कॉर्पिओ, पल्सर असा सहा लाखांचा पोलिसांनी जप्त केला आहे. पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी नगर, नेवासा, राहुरी, सोनई, घोडेगाव या ठिकाणी दरोडे टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशीत अनेक गुन्हे उघड होण्याची आशा पोलिसांना आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड, भोसले, उजे, तोडकरी, हवालदार शैलेश सरोदे, दिलीप तुपे, सुशांत दिवटे, वाघमोडे, बहिर, अनिल पवार, अडागळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

LEAVE A REPLY

*