दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बाहेर पडणार?

0

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेतून बाहेर पडणार आहे.

कारण दिशा वकानी मालिका सोडणार नाही, तर प्रेग्नंट असल्याने काही काळासाठी मालिकेत दिसणार नाही.

एका इंग्रजी वृत्तापत्राच्या माहितीनुसार, दिशा वकानी प्रेग्नंट आहे.

त्यामुळे काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. दिशा वकानी पूर्णपणे मालिकेला अलविदा करणार नाही.

दयाबेनभोवती मालिकेचं बहुतेक कथानक फिरतं. त्यामुळे दिशा वकानीला रिप्लेस करणं शक्य नाही.

त्यामुळे यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न निर्मात्याकडून सुरु आहेत. त्यानंतर दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला ब्रेक दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*