तेजस एक्स्प्रेसमध्ये हेडफोन्सची चोरी, एलईडीची तोडफोड

0

तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे.

या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे.

अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते.

काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले.

स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता.

त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

*