तीन कोटींचे प्रथम पारितोषिक प्रदान

0
शिरपूर : महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगरपरिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला असून 3 कोटी रुपयांचे बक्षिस देवून दि.4 मे रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात  आले.

माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वरवाडे नगरपरिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात आहे.

सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगरपरिषदेमार्फत सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दि.20 एप्रिल रोजी नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. ब वर्ग नगरपरिषदांमधून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि.4 मे रोजी सकाळी 11 वाजता मुंबई नरिमन पॉईंट येथील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल तसेच पदाधिकारी व अधिकारी यांना पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*