तिसगावमध्ये अडवले जाणार 287 टीसीएम पाणी

0

करंजी (वार्ताहर)- पाथर्डी तालूक्यातील तिसगाव येथे जलयुक्त अभियान व चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत सुमारे चौदा लाख रुपये खर्चाच्या निधी मथुन चार बधार्‍यामधील गाळ काढणे व रुंदीकरण करून 287 टी सी एम पाणी आडवुन गावचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहीती ग्रामपंचायत सदस्य भाउसाहेब लवळडे यांनी दिली आहे .

 
तिसगावला सातत्याने दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे शासवत पाणीसाठा जवळपास नसल्याने दरवषी मढी शिरापूर या भागातुन वाहुन येणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे तिसगावला मोठा पुर येतो तिसगावमधुन वाहुन जाणारे पाणी तिसगावमधील काँक्रीटबंधार्‍यामध्ये साठवले तर काही प्रमाणात का होईना तिसगावच्या शेतकर्‍यांच्या सिंचन क्षेत्रात वाढ होईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात निश्चित सुटणार आहे.

 
तिसगाव येथील वृंदानदीवरील वाघ वस्ती, लवांडेवस्ती आणि तुळजापुर वस्ती, जुगणी वस्ती या ठिकाणच्या काँक्रिट बंधार्‍यातील गाळ काढण्याचे व रुंदीकरणाचे काम हाती घेतले असुन या कामांमुळे सुमारे 287 टी सी एम पाणी या बंधार्‍यामध्ये आडवले जाणार असुन या कामासाठी सुमारे चौदा लाख रुपये खर्च केला जाणार असुन तिसगावचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी व गावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावचे जेष्ठ नेते माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असुन.
तिसगावच्या पाणीप्रश्नाबाबत सर्वच पदाधिकारी संवेदनशील असुन त्या दृष्टीनेच तिसगाव मथुन वाहुन जाणारे पुराचे पाणी आडवुन त्याची साठवणूक करण्यासाठी गावातील व गावाजवळील सर्व बांधार्‍यामधील गाळ काढुन त्याचे रूंदीकरण व खोलीकरण करूण साठवण क्षमता वाढवली जाणार असुन तिसगावच्या शेतकर्‍यांनी सुदधा नविण बंधार्‍यासाठी साईट उपलब्ध करून दिल्या पाहीजेत व जुन्या बांधार्‍यातील गाळ काढतांना सकारात्मक भूमिका घेतली तरच तिसगावमधुन दरवषी वाहुन जाणारे पुराचे पाणी आडवुन त्या पाण्याच्या माध्यमातुन तिसगावचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे लवांडे यांनी सांगितले.

 
तिसगावमध्ये काँक्रीटबंधारे बांधण्यासाठी अनेक ठिकाणी साईट उपलब्ध आहेत मात्र बंधारा करण्यासाठी शेतकरी तयार होत नाहीत म्हणुनच दरवर्षी तीसगावच्या शेतकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रा पं सदस्य सचिन साळवे , आंबादास शिंदे , भिवसेनअकोलकर यांनी म्हटले आहे . चौकट ,,लवांडे यांनी स्वतहा बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी व त्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याच्या कामाकडे लक्ष दिल्याने या वर्षी तिसगावचे बांधारे वाहुन जाणार्‍या पाण्याने तुडूंब भरतील व तिसगावमधील पाण्याचा प्रश्न हमखास मार्गी लागेल असा विश्वास लवांडे यांनी व्यक्त केला आहे .

LEAVE A REPLY

*