तारकपूर एसटी स्टॅण्डला अण्णाभाऊ साठे नाव द्या

0

खासदार दिलीप गांधी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील तारकपूर एसटी स्टॅण्डला लोकशाही अण्णाभाऊ साठे बस स्टॅण्ड नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन भाजपाचे झोपटपट्टी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी नुकतेच खासदार दिलीप गांधी यांना दिले.
घोरपडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर शहराची सर्वत्र ओळख आहे. शहरात जुने बसस्थानक, पुणा बस स्टॅड, आणि तारकपुर एस.टी.स्टॅण्ड अशा नावाने ही बस स्थानके ओळखली जातात. त्यापैकी तारकपूर भागातील स्टॅण्डला लोकशाहीर अण्णाभाऊसाठे बसस्थानक असे नामकरण करावे. शहरातील सावेडी हा भागात खूप लोकसंख्या वाढली असल्याने त्या जवळचे असलेल्या तारकपूर हे मोठे बसस्थानक असून तेथून जिल्हा आणि परराज्यात सुध्दा बस ये जा करतात. अशा मोठ्या बसस्थानक मोठया माणसाचे नाव देणे योग्य ठरले. त्यामुळे आपण आपले शिङ्गारास पत्र दयावे असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संतोष शिरसाठ, सुनिल सकट, अशोक भोसले, राजेंद्र घोरपडे, संगीता मुल्े, लिला आगरवाल, विश्‍वनाथा पांडे,बाळासाहेब भोसले, पोपट भोसले, नितिन घोरपडे, संदीप पवार, भारत धोंडीराम डाके, नरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*