तामिळ ‘एस ३’ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सनी देओल!

0

सनी देओल‘घायल रिटर्न्स’ नंतर पुन्हा एकदा अॅक्शन सिनेमात काम करणार आहे.

मुख्य म्हणजे या सिनेमात तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओके जानू’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘गजनी’ या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी केलेले रवी के. चंद्रन हे पहिल्यांदा हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाचे नाव आहे ‘एस ३’. तामिळ सिनेमांचा सुपरस्टार सूर्याच्या ‘एस ३’ या सिनेमाचा हा रिमेक आहे.

मूळ सिनेमात सूर्यासोबत श्रुती हसन आणि अनुष्का शेट्टी यांनी काम केले होते.

सनीला पहिल्याच भेटीत या सिनेमाची कथा आवडली होती. सिनेमाचे चित्रीकरण वर्षाअखेरीसपर्यंत सुरू होणार आहे. तामिळ ‘एस ३’ सिनेमात खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणारा ठाकूर अनुप सिंग हिंदी रिमेकमध्येही खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही. सनीने आतापर्यंत ‘त्रिदेव’ आणि ‘इंडियन’ या सिनेमांमध्ये पोलिसाची व्यक्तिरेखा साकारली होती.

LEAVE A REPLY

*