तरूणाचा बुडून मृत्यू

0

भातोडी तलावातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भातोडी गावाच्या परिसरात असणार्‍या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षाच्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. किशोर भाऊसाहेब साबळे असे बुडालेल्या तरूणचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली असून मयत किशोर हा मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भातोडीचा तलाव हा सर्वांना परिचत तलाव आहे. या तलावात बुधवारी सकाळी किशोर साबळे (राहणार भातोडी) हा पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने किशोर तलावातील पाण्यात बुडाला. ही घटना सकाळी 8 ते 10 दरम्यान घडली. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अशोक मारूती उमाप यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

गेल्या काही वर्षापासून भातोडीच्या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आलेला आहे. यामुळे तलावाची खोली वाढली असून यामुळेच साबळे याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*