पर्यटकांना खुणावतेय डोंगरातली काळी मैना

0
त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) : उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी आणि नाशिक त्र्यंबकेश्वरचा गारवा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक सध्या जिल्ह्यात दाखल होत आहेत. उन्हाळ्यात डोंगराची काळी मैना दाखल झाल्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तसेच येथील आदिवासी वर्गाला रोजगारदेखील मिळाला आहे.
डोंगराची काळी मैना अर्थात करवंद बघताच तोंडाला पाणी सुटते. असा हा रानमेवा  भाविक हमखास खरेदी करतात. अलीकडे मात्र डोंगराची काळी मैना दुर्मिळ होत चालली आहे. जंगल कमी झाले त्यामुळे ठराविक ठिकाणीच करवंद आढळतात.
त्र्यंबकेश्वराच्या परिसरातील डोंगराळ  भागात पहाणे  बारी तोरंगण घाट येथून  करवंद महिला आदिवासी वर्ग बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने येथील महिलांना नवा रोजगार मिळाल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*