डॉ.राऊत यांचा पदभार काढला

0

साक्री / पशुवैद्यकीय लघु चिकित्सालय तालुका कार्यालयाच्या प्रशासनाने महाराष्ट्र दिवस साजरा करतांना उदासीनता दाखवल्याप्रकरणी पशुवैद्यकीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त डॉ.अजय राऊत यांच्याकडून पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त यांनी त्यांच्या पदाचा पदभार काढून घेतला आहे.

1 मे महाराष्ट्र दिनी तालुका पशुवैद्यकीय कार्यालायकडून ध्वजारोहण करते वेळी ध्वजसंहितेचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली होती.

याविषयी दैनिक देशदूतने वृत्त प्रकाशित केले होते.

तहसीलदार संदिप भोसले यांनीही कारणे दाखवा नोटीस दिली आहे. दोन दिवसांपासून महसूल, जिल्हा परिषद व पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारींकडून याप्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याने शहरात याच घटनेची चर्चा सर्व कर्मचारी व नागरिक करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*