डॉ. गुलाटींची ‘कॉमेडी फॅमिली’ सज्ज

0

सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर, संकेत भोसले हे ओळखीचे विनोदी चेहरे पुन्हा एकदा त्यांच्या धमाल विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी सज्ज झालेत.

कपिलच्या शोमधून काढता पाय घेतल्यानंतर सुनील ग्रोवर ‘द कॉमेडी फॅमिली’ या कार्यक्रमातून विनोदी खेळी करताना दिसणार आहे.

मुख्य म्हणजे कपिल शर्माच्या टीममधील बरेच चेहरे यात सुनीलची साथ देणार आहेत.

सुनील त्याच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय खरा. पण, हा एक लाइव्ह कार्यक्रम असेल. या कार्यक्रमातूनच अहमदाबादमध्ये मे महिन्याच्या २७ तारखेला ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि त्यांचं अतरंगी कुटुंब विनोदी फटकेबाजी करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*