डॉक्टरांचे भावविश्व मांडणारा म्युझिक व्हिडीओ ‘चुकलंच जरा डॉक्टर होऊन’!

0

डॉक्टरांची बाजू मांडणारा ‘चुकलंच जरा डॉक्टर होऊन’ हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘विक्टरी व्हिजन बॅनर’ अंतर्गत अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित ‘चुकलंच जरा डॉक्टर होऊन’ हे गाणे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेते.

या गाण्यात अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव तसंच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी डॉक्टरांच्या भूमिका केल्या असून, डॉक्टरांचे भावविश्व मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे या गाण्यात वास्तविकता दाखविण्यात आली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत खऱ्या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे या गाण्याला जिवंतपणा लाभला आहे.
प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘चुकलंच जरा डॉक्टर होऊन’ या गाण्याचं रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलं आहे. डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत.

अमोल माने संकलित केलेल्या या गाण्याचं छायाचित्रण मौलादास गुप्ता यांनी केलं असून, कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*