डिझेलची होम डिलिव्हरी सुरु, बंगळुरु देशातील पहिलं शहर

0
वर्तमानपत्राप्रमाणे डिझेलची होम डिलिव्हरी करणारं बंगळुरु देशातील पहिलं शहर बनलं आहे.
काही आठवड्यांपूर्वी केंद्र सरकार अशाप्रकारची योजना सुरु करण्याचा विचार करत असल्याची घोषणा पेट्रोलिअम मंत्रालयाने केली होती.
फक्त एका वर्षांपुर्वी सुरु झालेल्या स्टार्टअपने 15 जूनपासून 950 लीटर क्षमता असलेल्या वाहनांमधून डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केली आहे.
कंपनीने आतापर्यंत 5000 लीटर डिझेलची होम डिलिव्हरी केली आहे.
डिझेलचे भाव रोज बदलत असल्याने त्यादिवशी असलेला भाव आणि डिलिव्हरी चार्ज एकत्रित केला जात आहे.
100 लीटर डिझेलची होम डिलिव्हरी करण्यासाठी 99 रुपये आकारले जात आहेत.
तर 100 लीटरहून जास्त असल्यास डिझेलच्या किंमतीसह प्रती लिटरमागे एक रुपया आकारला जात आहे.
स्टार्टअपला 20 मोठे ग्राहक मिळाले असून यामध्ये 16 शाळा आणि काही अपार्टमेंट्सचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*