टोकरे कोळी समाजाचा आदर्श विवाह

0

नंदुरबार / कोळी समाजाने अनिष्ठ प्रथांना फाटा देत आदर्श विवाह करण्याची प्रथा सुरु केली आहे.

यात हुंडा, आहेर देणेघेणे बंद करण्यात आले असून एक लग्न दोन झाड असा नवीन पायंडा पाडला आहे.

कोळी समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक करण्यात येत आहे.

समन्वय समितीच्या पुढाकाराने कोळी समाजातील विवाह समारंभात अनिष्ट प्रथांना फाटा देत आदर्श विवाह होवू लागले आहेत.

त्याचा प्रत्यय दोन्ही जिल्ह्यात येवू लागला आहे. आदिवासी टोकरे कोळी समन्वय समितीने धुळे- नंदुरबार जिल्हयातील टोकरे कोळी समाजाला आवाहन केले होते की, हुंडा न घेणे, नारळ गोटा पध्दत बंद करणे, आहेर देणे व घेणे बंध करणे तसेच जेवणाच्या पंगतीत नारळ लावणे, खोबरे वाटी लावणे बंद करणे अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला.

वाघाडी (ता. शिरपूर) येथील वर पिता सोमनाथ उत्तम बोरसे व प्रतापपूर (ता.तळोदा) येथील वधु पिता बाबुलाल एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत एक आदर्श विवाह घडवून आणला आहे. चि.डॉ.यशकुमार व चि.सौ.कां. तेजस्विनी या नव वधू-वरांचा विवाह जमवून या दोन्ही परिवारातील सदस्यांनी हुंडा घेतला नाही, तसेच वधू वरांच्या लग्नासाठी कपडे साध्या पध्दतीने केले.

वधू पक्षाचे दोन व्यक्ती व वर पक्षाचे दोन व्यक्ती मिळून बस्ता केला. या नव वधू वरांचा विवाह शहादा येथे झाल.

वधू – वरांनी एक लग्न दोन झाडे लावून समाजातील अजून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

*